Tuesday, January 17, 2023

 

प्रसादस्तु प्रसन्नता……!

 प्रसादस्तु प्रसन्नता……!

कित्येक वर्षांपूर्वी सद्गुरूंना उषाने विचारले होते की काका तुम्ही घरीं कधी येणार आहांत. त्यांनी लगेच उत्तर दिले की आम्ही तर दररोज पहांटे तुमचे घरी येत असतो, पण काय करणार तुमची सर्व दारें तर बंद असतात ना


उषाने त्या वक्तव्याचा एक अर्थ काढून दररोज चुकतां पहांटे ठीक सहा वाजता दर्शनी द्वार सताड उघडे ठेवायचा परिपाठ सुरू केला. मात्र त्या आधी रात्री निजायला जाण्यापूर्वी ती चुकतां, कितीही दमलेली असतानाही बाहेरच्या हॉल मधील सर्व खुर्च्या सोफे रिकामे ठेवीत त्यांवरील सुरकुत्या वगैरे नीट करीत आणि पादत्राणे बाजूला सरकावून ठेवत आलेली मी गेली कितीतरी वर्षें पाहात आलोंय् ! ठीक सहा वाजता हॉलमधले सर्व दिवे लावून भक्तिभावाने दार उघडून ती एका बाजूला उभी राहते, जणू ती .पू. काकांचे नि इतर सर्व संतमंडळींचे स्वागत करत आहे. हा नित्यनेम ती लंडनच्या कडाक्याच्या थंडीतही चुकतां पाळत असते


मित्रांनो हे सर्व सविस्तर सांगण्याचा उद्देश इतकाच की तिच्या घरांत कायम प्रसन्नता आणि शांती तुम्हीही अनुभवली असेल आणि त्याचे कारण आहे या घरांत नित्य निवास असतो सद्गुरूंचा नि इतरही सर्व संतसत्पुरूषांचा

दुसरे, पर्यावरणाचा शास्त्रशुद्ध विचार करू म्हटले तर रात्रभर घरांत साचून राहिलेला कार्बन नि इतर दूषित वायू दार उघडतांच बाहेर निघून जातात आणि बाहेरची शुद्ध हवा आपसूक आत शिरते

तिसरे, काका म्हणाले तसे आपल्या हृदयाची कवाडें आपण कुलूप लावून बंद केलेली असतात, त्या हृदयग्रंथींना मोकळे करण्यासाठी पहाटेचे ओंकार सुप्रभातम आणि स्तोत्रपठण अत्यंत उपयुक्त ठरते यांत शंका नाही. पहाटेच्या ओंकार साधनेमुळे आख्खा दिवस अत्यंत उत्साहात आणि यशस्वी ठरतो असा अनुभव प्रत्येकाने घेऊन पाहण्यासारखा आहे


या लिखाणाचे शीर्षकप्रसादस्तु प्रसन्नताहे पाहून तुम्हाला नवल वाटेल कदाचित्, पण खरोखरचप्रसाददेण्यासाठी सर्व संतमंडळी आपल्या घरात प्रवेश करीत असतात आणिप्रसन्नतेसारख्या प्रसादाचा कोण अव्हेर करील

रहाळकर

१७ जानेवारी २०२३


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?