Thursday, November 24, 2022

 

चालणारी माणसं !

 चालणारी माणसं

गेले चार दिवस मुम्बैला लेकीकडे डेरेदाखल झाले आहोंत आणि ग्यालरीत बसून माणसेच माणसे पाहातोय्, सतत झपाझप चालत जाणारी नि येणारी ! पुण्यपत्तन मधल्या बावधन बुद्रुक ग्रामीं इतकी माणसं पायीं चालताना क्वचितच दिसतात आतांशा ! जो तो आपापल्याबाईकवर झूम करत दिसेनासे होतानाच आढळतो हल्ली हल्लीं. गेलाबाजार काही मोटारवाले धनिक एकदा बाहेर पडले की रात्र उगवेपर्यंत शोधूनही सापडणार नाहीत म्हणा.

ते असो. मला आत्तां सांगायची आहेत ती मुम्बैतली झपझप पायीं चालणारी माणसंच माणसं. बरं तीं सुध्दा झकपक पोषाखांत, जणूं आताच कुठेतरीदाखवायलाकिंवापाहायलानिघाल्यासारखी ! आमच्या पुण्यांत स्वत: किती गबाळे आहोत हे दर्शविण्याची जणू चढाओढ असते. जितका किंवा जितकी गबाळी तितका किंवा तितकी बुध्दिमंत आणिवेल् टु डूफ्यामिलीतली अशा गोड गैरसमजात असतात हल्लीचेनव-पुणेकर’ ! (जुने पुणेकर तसे नसतात बरं का ! हो, उगीच अपमान नाही करून घ्यायचाय् आपल्याला. तसे जुने काय नि नवे काय, अपमान करायला नि करून घ्यायला कायमच तत्पर असतात ते, नाही म्हणायला

बरं तेही असो. मुम्बैतली माणसं जितकी चालतात त्याची कोणी संगणकावर बेरीज केली तर कित्येक पृथ्वी प्रदक्षिणांचं गणित सहज मांडतां येईल. (‘रिसर्चसाठी एक फुकटचा सल्ला किंवा विषय ! तसेहीओरिजिनलपुणेकर फुकट सल्ला द्यायला कधीच मागेपुढे पाहात नाहीत. तसा मी काही व्होर्जिनल पुणेकर नाही, पण आतांशा माझ्या बेरकी लिखाणांमुळे मीच तो जन्मजात पुणेकर असा लौकिक मिळवून आहे ! असो

आत्तांच पुन्हा ग्यालरीत येऊन बसलोंय् नि पाहातोय खालीं सतत चालणारी असंख्य माणसं. कोणीच कुणाशी क्षणभर थांबून हवापाण्याच्या गप्पा मारत नाहीत हे पाहून मन जरा विषण्ण होते खरे. कारण लंडनच्या फूटपाथ वरून समोरून येणारा एखादा रिकामटेकडाव्हाट ॲन ॲट्राशियस वेदर, किंवा व्हाट ब्यूटिफुल मॉर्निंग वेदरअशी पुस्ती जोडायला कुचराई करत नाही ! इथे मात्र जो तो आपल्या घाईंत, नऊ त्रेपनची सीएसटी फास्ट सोडून चालणार नसते ना ! मज सेवानिवृत्ताला हल्लीची घडाळ्याशी चाललेली कसरत खरंच पाहावत नाही हल्लीं ! मग मी पुन्हा एकदा ग्यालरींत बसून चालणारी माणसं मोजत बसतो

रहाळकर

२४ नोव्हेंबर २०२२ (मुम्बई


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?