Monday, October 03, 2022

 

मॉंझी गीत …..!

 मॉंझी गीत ………

आज खूप वर्षांनी खुशबू या चित्रपटातले मांझी गीत कानावर पडले आणि गुलझारच्या शब्द-रचनेने नि किशोरकुमारच्या गंभीर आवाजाने मला खूप खूप दूर, थेट समुद्रापर्यंत फिरवून आणले

मांझी रे….. अपना किनारा……नदिया की धारा है ‘  !

गीतकार , नव्हे, मांझी म्हणजे नावाडी म्हणतोय की नदिया की मंझधार ही अपना किनारा है ! वाह, क्या बात है

आता तुम्ही म्हणाल यांत कुठले वेगळेपण दिसतंय् तुला, तर मग मी म्हणेन की खूप गहन अर्थ छिपून राहिलाय त्यांत भैय्या ! शोधून पहा, नक्की सापडेल

या मांझी गीताबरोबरच इतर अनेक तशी गीतें शोधून पुन्हा ऐकली आज. रिकामपणचा सदुपयोग केला बऱ्यापैकी

मला अजून आवडलेलेबंदिनीमधले बर्मनदांचे सुरेल गीत. खरंतर अशी गाणी नावाड्याला सहज सुचत जातात आणि तीं तो मोकळेपणाने गात राहतो. व्हेनिसच्यागोंडोलांततिथल्या नाविकाने उत्य्फूर्तपणे गायिलेले त्याच्या भाषेंतले गीत कळले नसले तरी मोहून टाकणारे निघाले हे निर्विवाद

तसं पाहिलं तर आपल्याकडची सुप्रसिध्द म्हण आहे, ‘जात्यावर बसलं की ओंव्या सुचतात.’ खरंय् ते, कारण तो एकंदर माहौल अचानक आपल्या मनावरची झापडं अलगत दूर सारून आपल्यातच दडून बसलेलं सुंदर गाणे गुणगुणायला लावतो ! अगदी उत्स्फूर्त असतो तो अविष्कार. पहा, मुद्दाम आवर्जून जरा जात्यावर बसून पहा नि अनुभवा तो दिव्यानंद ! ! 

रहाळकर

ऑक्टोबर २०२२


Comments:
Hello Dr. Rahalkar (Kaka),
I am Sonia Uttam Bairagi, from Mahindra Colony, Igatpuri. I Hope that you will remember me! Presently I am doing Phd on 'Comparative study of translations of Jnaneshvari from the question of spirituality' as my Guru inspired me to do so. And luckily I found a translation of Jnaneshvari by Shirish Rahalkar which ignites my curiosity. Kindly send me your mail or contact number as I am very eager to talk to you. My email is bairagisoina@gmail.com .
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?