Saturday, October 01, 2022

 

गुड न्यूज बायबल !

 गुड न्यूज बायबल्

आज हा बाबा चक्क किरिस्तांव् झाला की काय अशी तुम्हाला शंका येईल कदाचित्. पण लंडन मधील प्रत्येक दवाखान्यात (सर्जरीत) वरील शीर्षक असलेले पुस्तक हमखास डेस्कवर दिसेल. कदाचित तिथे सांगितले जाणारे उपचार थोडे श्रध्दापूर्वक अंगिकारले तर बरे, असा प्रांजळ विचार या मागे असणे शक्य आहे ! तसे नसले तरी मी केवळ वेळ घालवण्यासाठी ते पुस्तक चाळले होते. खरंतर ख्रिश्चन धर्माबद्दल मला खूपसे आकर्षण नसले तरी कुतूहल निश्चित आहे. तसे मी मराठीतलेकुरआन्देखील नजरेखालून घातलेले स्मरतें. ते गुड न्यूज बायबल चाळताना साहाजिकच अनेक वर्षांपूर्वी पाहिलेलाटेन कमांडमेंट्सहा चित्रपट आणि त्यांत मोझेसच्या आज्ञा थोड्याफार आठवल्या. असेचन्यू टेस्टामेंटदेखील वाचलंय मी थोडे थोडे

हे सर्व सांगण्याचे कारण इतकेच कीगुड न्यूजकिती प्रकारची नि कशी असू शकते याचा लेखाजोखा घेणे ! निराश केले का मी ? तरी पण ऐकाच माझे

एखादी नव-परिणित वधू केव्हा एकदाची गुड न्यूज देते इकडे बहुतांश नातेवाईकांची जिज्ञासा असते ना, अगदी तसेच (आमच्या काळीं ) ‘केव्हा एकदा हा गधडा म्याट्रिकचा किल्ला सर करतोय्अशी खंतवजा हुरहूर असे. मात्र एकदा का थर्डक्लास का असेना, गंगेत घोडे न्हाल्याची गुड न्यूज गावभर पसरवण्यांत धन्यता मानत काही आईबाप

मुलगा झाला की गुड न्यूज नि मुलगी निफजली तरबेटर लक् नेक्स्ट टाईमअशी स्वत:चे सांत्वन करून घेणारे सासू सासरे काही कमी नसत - त्या काळीं - कारण आता बेटा हो या बेटी, ऑल इजगुड न्यूज एनी वेअशीच प्रतिक्रिया ऐकता येते हल्लीं

ते असो, रात्रभर खोक खोक खोकणाऱ्या म्हाताऱ्याचा ठसका आटोक्यांत आला किंवा रिपरिप पडणाऱ्या पावसा सारखी सतत बडबड करणाऱ्या म्हातारीला अंम्मळ डोळा लागणे ही जशी गुड न्यूज असेल तसेच फारा दिवसांचे बध्दकोष्ट (constipation) एखाद्या अद्भुत चूर्णाने दूर झाले तर त्याच्या इतकीगुड न्यूजअसूच शकत नाही (असे स्वानुभवाने ठामपणे सांगू शकतो आज ! ) 

खूप खूपसडेमारलेत ना आज ? पण नेहमीच गंभीर विषय काय म्हणून हाताळावे कुणीही ? ? 

रहाळकर

ऑक्टोबर २०२२


Comments:
😀😀
 
This comment has been removed by the author.
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?