Friday, September 30, 2022

 

रिले रेस !

 रिले रेस !

काल अहमदाबाद येथील नरेन्द्र मोदी स्टेडियमवर झालेला अतिशय दिमाखदार सोहळा - छत्तीसाव्या अखिल भारतीय क्रीडा महोत्सवाचा - अनिमिष डोळ्यांनी पाहात असताना एका पाठोपाठ आठवणींनी अक्षरश: ‘रिले रेससुरू झाली मस्तकांत

केवळ दहा वर्षांचा असतांना शिवपुरीला गणतंत्र दिवसाचे निमित्त शाळेतर्फे कलेक्टर किंवा पोलिस परेड ग्राऊंडवर अनेक खेळांच्या स्पर्धा ठेवल्या होत्या, त्यांत चारशे फूट रनिंग रेस मधे मी चवथा आल्याने बक्षीस काही मिळाले नव्हते पण तो एकंदर माहौल मनांत घर करून गेला एवढे नक्की. त्याच दिवशीं इतर शाळांसोबत झालेलीरिले रेसपण पाहता अनुभवता आली होती

आज मात्र तशाच अनेक रिले रेसेस मनांत दाटून आल्या. खरोखर, पिढी दर पिढी आपण अनेकानेक संस्कार, चालीरीती, संवई वगैरे किती सहजपणेरिलेकरत आलो आहोत नाही ! प्रत्येक राष्ट्राचा, धर्माचा, परंपरेचा वारसा बहुतेक वेळा आपसूक पुढिलांसाठीपास ऑनकेला जात आलाय. अर्थात त्याला कम्यूनिझम् वा इस्लामचा अपवाद असेल कदाचित, जेव्हा ते पर्याय लोकांवरथोपवलेगेले असतील. तथापि बहुतांश परंपरांना परंपरागत म्हणणे क्रमप्राप्त ठरते. असो

याप्रंप्रागतचालीरीती कधीकधी खूप मनोरंजन करून जातात. कित्येकांना कुठलाच तात्विक किंवा ऐतिहासिक वारसा वा आधार नसतो, कारण-मीमांसा देतां येत नाही तर कित्येक अनाकलनीय, तर्काच्या पलीकडील असतात. अर्थात सगळ्याच परंपरांना तार्किक बाजू असेलच असे नाही, त्या जस्ट पाळल्या जातात ! उदाहरणे देऊ म्हणतां ? हात्तेच्या अनेक सांगता येतील की. पण नकोच, कोणीतरी कुठेतरी दुखावले जातील कदाचित नि केवळ मनोरंजन मागे पडून निष्कारण वादविवाद उद्भवतील. नकोच तो धोका, कारण परंपरा सांगते की असे बेसूर स्वर आळवणे टाळणे हेच भलें

रहाळकर

३० सप्टेंबर २०२२


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?