Wednesday, July 27, 2022

 

तत् त्वमसि !

 तत् त्वमसि

मित्रहो !

असतोs मा सद् गमय, तमसोsमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मांs अमृतं गमयही आर्त हांक हजारों वर्षांपूर्वीबृहदारण्येव उपनिषदांतगायिली गेली आणि तिने देशोदेशींचे लाखो करोडो लोकांची हृदयें हेलावून सोडली. शेकडो वर्षांपासून काही संधिसाधू आणि धूर्त लोकांनी माणसाला फसवून त्यांच्या अगतिकतेचा फायदा उठवीत स्वत:चा स्वार्थ साधला आणि त्याला अज्ञानरूपी घोर अंध:काराच्या गर्तेंत गटांगळ्या खायला लावल्या ; मानवी जीवन वेळोवेळी निराश, अश्रध्द आणि दु:खाच्या खाईंत गुदमरत राहिले

मात्र त्या वेळी देखील वेगवेगळ्या ठिकाणी संत महात्मे, सत्पुरूष, ऋषी, कवी यांनी वेळोवेळी अवतार घेतले आणि समस्त मानव जातीलासत् चित् आनंदया त्रयीची ओळख करून दिली. ‘सत्त्याचीवाट दाखवणारे हे वाटाडे दीपस्तंभाप्रमाणे यात्रेकरूंना वाट दाखवीत राहिले ; ज्ञानप्रकाशाने अमृतत्वाची जाणीव करून देत आले. अशा सत्यबोधकांनी स्वत:पासून दूर जात असलेल्या मानवजातीला त्याच्याउगमाकडेपुन्हा परत येण्यासाठी मार्ग दाखविला


लई भारी होतंय् का हे निरूपण ? पण अचानक आईन्स्टाईनची एक उक्ती आठवली, ‘A thought sometimes makes me hazy, Am I or the other is crazy’ ! (एक विचार मला कधीकधी अस्वस्थ करतो - मीच एकटा वेडसर आहे की इतर सुध्दा ! ) By the way, क्रेझी म्हणजे सेन्सलेस, इम्प्रॅक्टिकल, इनसेन वगैरे ! ! असो.

मला वाटतं की आईन्स्टाईन प्रमाणेच इतर अनेकांना निरनिराळ्या संदर्भात काहीहट् केकिंवा ॲबसर्ड वाटावे असे प्रश्न पडत असतील. (मला नेहमीच पडतात - चंद्रकांत काकोडकरांच्या रहस्यकथांतला  तिरळ्या डोळ्यांचा प्रभाकर नाही का मी ! ) 

तत् त्वमसिया महावाक्या बरोबर इतरही तत्सम वचनें सहज आठवली (इतका मीनिर्ढावलोंयसंस्कृत भाषेचा वापर करताना ! ) पण आज तो विषय मांडण्याचा फोल उपद्व्याप करायचा नाही असे वारंवार बजावतोय मी स्वत:ला

खरं तर मी कोण, काय, कसा आहे हे माझ्यापेक्षा इतर जास्त जाणतात आणि ते एकापरीस बरेच आहे, कारण स्व-स्वरूपाचा उहापोह करताना स्वानुभवा ऐवजी ऐकीव वा वाचीव सिध्दान्त विनाकारणफेकलेजातील

तथापि, दिसतं तसं नसतं ही उक्ती अतिशय सार्थ आहे हे निश्चित. ‘मीजो, जसा, कसा आहे हे इतरांपेक्षा मीच जाणतो हे सत्य वरील विधानाच्या अगदी विपरीत ठरतेय की ! मग खरा तो (तत्) कोण, कुठे, कसा

बुचकळ्यात पडलांत नाअखेर याला म्हणायचंय तरी काय ! मीही ! ! 

रहाळकर

२७ जुलाय २०२२


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?