Sunday, July 24, 2022

 

पन्नास वर्षां पासूनचे पुणें !

 पन्नास वर्षां पासूनचे पुणें

आम्ही पुण्यांत वास्तव्यास येऊन आतां बावन वरूषें लोटलींत. त्या आधी बावन्न सालीं चक्क महिनाभर पुण्यांत राहून गेलो होतो मावशीकडे. त्या वेळी सायकल चालवणे (फिरवणे) हा छंद तर होताच पण सोमवार पेठेतल्याकर्पे टॅन्कआणि डेक्कन जिमखान्यात विराजमानटिळक टॅन्कवर पोहोणे शिकण्याचा जीवघेणा प्रयोग करून झाला होता. जीवघेणा एवढ्यासाठी कीं पाठीवर बांधलेला डालडा चा डबा अचानक निसटला नि मी खूप गटांगळ्या खाल्ल्या होत्या. पाण्याची तेव्हा बसलेली भीती इतकी जबरदस्त होती की भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जाणाऱ्या लॉन्च मधे मी अक्षरश: डोळे घट्ट मिटून आईच्या मांडीवर दीड तास झोपून होतो. (अर्थातमेडिकलला आल्यावर इन्दौरच्या पहिल्या वहिल्या अतिशय मॉडर्न आणि सुंदरस्वीमिंग पूलवर’ -तेही म्युनिसिपालिटीने उभारलेल्या - पोहायला किंवा खरंतरतरंगायलाजे शिकलो ते तरंगणे आजतगायत चालू आहे. ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, ‘सूर मारणेवगैरे लीला मी केवळ खूप दूर ग्यालरींत बसून एन्जॉय करतो ! असो

त्या बावन सालींच चाखलेले कावऱ्यांचे मॅन्गो आईस्क्रीम अजूनही जिभेवर रेंगाळत आहे तसेच एरंडवणें पार्क मधली भेळ, पुन्हा कधीच तेवढे समाधान देऊ शकली नाही. तेही असो


गेल्या पन्नास वर्षांत खूप खूप बदल पाहिलेत मी पुण्यांत. (अस्सल पुणेकराच्या अनेकट्रेट्स्’ (Traits)  मात्र माझ्यापासून अद्याप कोसों दूर आहेत, कारण मी अजूनही स्वत:ला ओरिजिनल इन्दौरी मानतो ! ) 


वास्तविक पुण्यातली दीर्घकाळ केलेली नोकरी मुन्शिपाल्टीतलीच. पहिले सहा महिने मला फिरत्या दवाखान्यात काम करावे लागल्याने शहराचे सहाही बाह्य भागांतल्यावस्त्यामी पादाक्रान्त करू शकलो आणि नंतर मेडिकल युनिट्स चा प्रमुख म्हणून शहरातले गल्लीबोळ सुद्धा माझ्या नित्य परिचयाचे झाले. जवळजवळ बावीस वर्षें सर्व प्रकारच्या आणि पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांशी संपर्क झाला तसेच ट्रेड यूनियन्सच्या नेत्यांशी देखील बऱ्यापैकी घसट राहिली. आणि म्हणूनच पुण्यांतल्या स्थित्यंतरांविषयी मी जरासा अधिकार वाणीने बोलू शकतो

खरंच खूप बदललंय पुणे ! गेली काही वर्षेंपेठांचेबाहेर राहिल्याने पेठांची अशी सद्यस्थिती फारशी अवगत नसली तरी आधीचे कित्येक जुने वाडे कधीच जमीनदोस्त झालेत नि त्यांची जागा निव्वळ खुराड्यांनी घेतल्याचे ठळकपणे जाणवते आहे. एकेकाळी फटकळ तुसडेपणा आणि पुण्याचाजाज्वल्य अभिमानफक्त स्वप्निल जोशींच्या टीव्ही वरच्या वटवटी पुरता मर्यादित झाला असावा. खरंतरफ्लॅट संस्कृतीखोलवर मुळें धरते आहे अशी दाट कुशंका अस्वस्थ करतेयं आतांशा. यासंस्कृतींतहमे किसीसे क्या लेनादेना ही भावना बेचैन करणारी आहे


तेही असो मित्रांनो. इतर सर्वच शहरांबरोबर पुणे खूप झपाट्याने बदलत चाललंय हे निर्निवाद . शहरात उंच उंच इमारती म्हणजे फारतर चारपाच मजली, पण जरासे बाहेर पडतांच वीस पंचवीस मजल्यांचे काँक्रीट जंगल अक्षरश: चक्रावून टाकते. त्यांत आता सगळीकडेच मेट्रोची कामे झपाट्याने सुरू आहेत, भल्यामोठ्या उड्डाणपुलांनी अख्खे शहर होत्याचे नव्हते झालंय् जणू ! आता जुन्या खुणा नि लॅंडमार्क्स तर गायब झाल्यात निकहां गये हमअशी गोंधळात टाकणारी दृष्यें दिसली की आपल्या समोर, आपल्या हयातींत हे सर्व घडत असणे सुखावह वाटते हे नक्कीच.

काही वर्षांपूर्वी कॅप्टन मुश्ताक अली, भारतीय क्रिकेटचे आक्रमक फलंदाज, यांची एक मुलाखत पाहिली होती जेव्हा ते बरोब्बर पन्नास वर्षांनी लॉर्ड्स वरील एका समारंभासाठी इंग्लंडला गेले होते. त्यांना जेव्हा विचारले की तेव्हा आणि आत्तां लंडनमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला, तर त्यांचे उत्तर होते की अजूनही इथे तितकीच कडाक्याची थंडी आहे, बाकी काहीच पूर्वीचे राहिलेले नाही. आतां कदाचित पुण्याचे तसे म्हणता येणार नाही कारण आता इथले हवामान सुद्धा आमुलाग्र बदललेले जाणवेल माझ्या वयाचे मंडळींना. तेव्हा ते अतिशय प्रसन्न, स्वच्छ आणि मोकळे असे, कोणालाही हवेहवेसे. तेव्हाचे मराठी चित्रपट बहुधा पुण्यातील वातावरणाचे, अत्यंत चोखंदळ अशा रसिकांचे असे. खरंतर पुणेरी दाद मिळाल्या शिवाय कलावंतांचे समाधान नसे


लेकिन अब जमाना बदल गया है, लोग ज्यादाप्रॅक्टिकलहैं, उन्हे रिझाना अब आसान नही रहा. नव्हे, हा सूर निराशेचा नाही कारण एका प्रसिध्द लेखकाने लिहून ठेवलंय की इस बदलाव मे नई आशा है, नई जान ऊर्जा शक्ती ! म्हणूनच पुण्यातल्या या झपाट्याने होणाऱ्या बदलाचे स्वागत आहे

रहाळकर

२४ जुलाय २०२२



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?