Wednesday, June 29, 2022

 

‘ऐतिहात के तौर…..!’

 ऐतिहात के तौर

हिन्दीतला हा वाक्प्रचार आपण अनेक वेळा ऐकला असेल. याचा सरळ सोपा मराठीत अर्थ होतो - ‘इन केस…..’ आणि कठीण इंग्रजींत - ‘काळजीखातर’’ ! 

आपण बरेच वेळी एखादी योजना आखतांनाप्लॅन बी किंवा प्लॅन सी आधीपासूनच ठरवून ठेवतो. उद्देश असा की समजा मूळ योजना फसली तरी दुसऱ्या वा तिसऱ्या पर्यायाने ती येनकेन प्रकारें फलद्रूप व्हावी


खरंतर आपल्या संपूर्ण जीवनपटाचे सुध्दा हेच ब्रीद आपण कळत कळत पाळत आलेले असतो. प्रत्येक कर्म किंवा कृती करण्या आधी आपण सहसा त्याचे मिश्र फलाची अपेक्षा ठेवतऐतिहात के तौरपर्याय मनांत ठेवून असतो. मला वाटतं वरील वाक्प्रचार आता बऱ्यापैकी ध्यानात आला असावा तुमच्या

आत्तां आज या विषयावर का बोलावेसे वाटले मला असा प्रश्न पडेल कदाचित तुम्हाला, किंवा बहुधा नाहीही. तरी पण मला काही सांगायचंय यावर (देखील) ! 

असं पहा की आतांशा समाज-जीवनांत निरंतर स्थित्यंतरं, आक्रोश, अनरेस्ट आणि एकूणच नैराश्य भावना वाढलेली आढळते. गलिच्छ राजकारण, सवंग पत्रकारिता, वैयक्तिक हेवेदावे नि चिखलफेकीचा नको तितका सुळसुळाट पाहतोय आपण डोळ्यांवर झांपड ओढून. मले वाटते हे काही बराबर नाही चाललंय ! कोणीतरी उठेल, आव्वाज उठवेल, सुयोग्य अशी घडी बसवायचा प्रयत्न करेल, थोडक्यात एक मिनीक्रान्ती घडवून आणेल असा वेडगळ विचार कधीकधी खूप अस्वस्थ करून टाकतो मला

या निमित्ताने मला सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी कविवर्य अनिलांची कविता याद आली. ‘सारेच दीप कसे मंदावले आतांअसे शीर्षक होते त्या कवितेचे नि स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळांतही कित्येक वर्षे एकूणच सर्वसामान्य माणूस कसा भेदरलेला, निराश नि गलितगात्र झाला होता याचे विदारक चित्र त्या कवितेत अनिलांनी रेखाटले होते. अर्थात आज नरेन्द्र मोदींसारखा काबिल नेता आपल्याजवळ आहे पण देवेन्द्रची उणीव पावलोपावलीं जाणवते  हेही वास्तव आहे. गेली दोन अडीच वर्षें अतिशय गलिच्छ वातावरण राजकीय क्षेत्रात आपण पाहात आले आहोत नि त्यातही गेला महिना दीड महिना तर किळस यावी अशा घडामोडींनी कमालीची निराशा वाटते. ‘कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्रअसे खडसावून विचारावेसे वाटतंय् आज

तथापि, या वातावरणाचा अंत होऊन कल सुबह कुछ अच्छा सुनाई देगा अशी त्या परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो, निदानऐतिहात के तौरदेवेन्द्रची तांतडीने नियुक्ती व्हावी असे वाटते मला.

(इथेऐतिहातकसा काय, हा तुम्हाला पडलेला प्रश्न मलेही पडलाय म्हणा ! ! ) 

रहाळकर

२९ जून २०२२


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?