Tuesday, April 26, 2022

 

अमीरी और फ़क़ीरी !

 अमीर फ़क़ीरी …..! 

काल परवां श्रीश बरोबर बोलताना मीअमीरी और फकीरीया विषयीं काही लिहिण्याचा मनोदय बोलून दाखवला. त्याने लगोलग अनूप जलोटांच्या एका प्रख्यात भजनाची लिंक पाठवून दिली. त्या भजनाची सुरूवात अशी आहे


“-मन लागो मेरो यार फकीरी में...

जो सुख पावो राम भजन में, सो सुख नाही अमीरी में-“ ……वगैरे.


वास्तविक हे दोन्ही शब्द ॲन्टागोनिस्टिक वाटतात ना तुम्हालाही ? खरेतर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या, कारणचित् बोले तो चित् और पट् बोले तो पट् भीहै वह दोनों ! नाहीच पटणार तुम्हाला याची खात्री असल्याने थोडे विवेचन करावेच लागेल आजही


असे पहा, माझ्या वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर मला किमान डझनभर अमीर फ़क़ीर भेटले जे अजूनही आपली श्रीमंत फकीरी जपून आहेत. त्याचे कारण ते अमीर असले तरी त्यांनी आपली साधूवृत्ती चांगलीच जोपासली आहे. अमीर असताना आपली अमीरी मिरवणें काहीच कठीण नाही, मात्र अमीरींत फकीरी वृत्ती सांभाळणे फार अवघड असावे. त्यांतही फकीरीचा देखील टेंभा मिरवणें केवळ हास्यास्पद ठरूं शकते

अर्थात वर दिलेल्या भजनांतराम-भजनला अनन्य महत्व आहे. ते भजन म्हणताना किंवा त्यावर चिंतन करताना वैराग्य आपसूक झिरपले पाहिजे तरच त्याफकीरीचा आनंद अनुभवतां येईल. फकीरी म्हणजे सर्वसंग परित्याग करणे नसूनमनौनिविरक्ती अभिप्रेत आहे हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही

मघां म्हटल्याप्रमाणे माझ्या परिचयाचे किमान डझनभर अमीर फकीर अजूनही हयात आहेत काही अस्तंगत झाले असले तरीही. मी त्यांचेतील विलक्षण निगर्वीपण पाहिले-अनुभवले आहे, स्वत: अत्त्युच्च शिखरांवर असूनही ! कितीही मोठी उंची गाठून देखील त्यांचे पाय कायम जमीनीवर राहिलेत. दानधर्मांत अतिशय सढळ असूनही त्याची वाच्यता चुकूनही घडत नाही त्यांचेकडून. खरोखर उजव्या हाताने काय नि किती दिले त्याची गणती डाव्या हाताला तर नसतेच पण ते स्वत:ही ते कधीच विसरले असतात

माझे एक जुने स्नेही नि फर्ग्यूसनचे तात्कालीन प्राचार्य मला आवर्जून विचारत कधीकधी - ‘डॉक्टर, तुम्ही पाहिल्या आहेत अशा व्यक्ती ?’ मी ठासून होकारार्थी उत्तर देई. विशेष करून पुट्टपर्थीच्या भेटींत आणि तिथे वास्तव्यास असतांना माझा अशा कित्येक व्यक्तींशी संपर्क झाला जे कोट्याधीश, नव्हे अब्जाधीश असूनही आश्रमांत  फकीरीचे जीवन वर्षानुवर्षें जगत आलेले होते. त्यांना बाह्य जगाचा जणूं पूर्ण विसर पडलेला मी प्रत्यक्ष पाहिला-अनुभवला आहे. ( मीही तसा प्रयत्न करून पाहिला काही महिने - मात्र मी काही कोट्याधीश अब्जाधीश तर नव्हतोच, अगदी लखपतीही नव्हतो ! म्हणतात ना मोर सुंदर नाचत-दिसत असला तरी लांडोराने स्वत:ला मोर समजूं नये ! ! ) असो.


संवईप्रमाणे विषयांतर झाले खरे, पण मला अगदी आंतून खरी फकीरी साद घालत असते. त्या हांकेला मी कधी प्रतिसाद देणार ते मला माहीत नाही - कदाचित या देहीं, या जीवनांत शक्य नाही होणार पण मीच माझा कधीतरी केव्हातरी त्या वृत्तीचा नक्की अंगिकार करीन, कारण तो माझा सुप्त संकल्प आहे. (मना त्वां सत्यसंकल्प जीवीं धरावा ! ) 


(आयुष्यावर बोलूं कांही, तसे फकीरीवर बोलूं कांही असा संकल्प केला खरा, पण नाही जमली भट्टी आज ! ) सबब तात्पुरती विश्रांती ! ! 

रहाळकर

२६ एप्रिल २०२२


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?