Wednesday, February 23, 2022

 

शिळी कढी !

 शिळी कढी

आपल्या मराठीत अनेकानेक म्हणी प्रचलित आहेत. एके काळीशिळ्या कढीला ऊतअसे म्हणत. मी आज त्याचे आधीराहा शब्द जोडीन म्हणतो ! खरोखर, गेले काही महिने सर्वच टीव्ही चॅनल्सवर वारंवार दाखवलेले काही चेहेरे , त्यांचे अविर्भाव नि धमक्या पाहून ऐकून सर्वच जाणकार श्रोत्यांना अक्षरश: वीट आला असेल. मात्र तोच धागा पकडून काहीतरी (निदान) बाष्कळपणा तरी करूंया

अनेक वर्षांपूर्वी दिल्लीच्याशंकर्स वीकलीया साप्ताहिकांतकोरावनजीया उपनांवाने प्रो. कस्तुरी धमालसटायरलिहीत. नंतर इन्दौरच्यानई-दुनियांत’ ‘सुनो भाई साधोया नांवाचे खुसखुशीत सदर हमखास गुदगुल्या करत असे. नुकतेच पुण्याच्यासकाळमधलेढिंग टॅंगनामक दररोज येणारे सदर खूप मनोरंजन करत असे (लेखक प्रवीण टोकेकर


हल्ली मात्र अभिजात विनोद आणि सटायर अभावानेच कानी पडतात. अर्थात हत्ती आणि मुंगी यांच्या दंतकथा  जेव्हा नातवंडें पुन्हा पुन्हा सांगतात तेव्हा त्यांच्या आनंदाखातर आपण मोठ्ठ्याने हंसतोच ना ! टीव्ही वरचे हल्लीचेबाईट्सपाहून खरंच हंसावं की रडावं ते कळेनासे झालेंयआतांशा’ ! असो

मूळ मुद्दा आहे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा

आपल्यातली किती तरी मंडळी (माझ्यासकटखूप जुन्या जुन्या आठवणी नवनवीन संदर्भ देऊन वारंवार मांडायचा प्रयत्न करतात. क्वचित् संदर्भहीन सुध्दा असतात म्हणा, पण प्रथम ऐकणाऱ्यालाच त्या ऐकाव्याशा वाटतात. इतरांना तो शिळ्या कढीचाच प्रत्यय येत असतो. (हे कळणे देखील भाग्यलक्षण नाही का).  तेही असो

कित्येकांना जुने प्रसंग सांगतानाकशी खोड मोडली त्याची (किंवा तिचीअथवा कशी जिरवलीम्हणण्यांत रस असतो. खरंतररात गई, बात गईअशी वृत्ती अधिक मन:शांती देते, पण वारंवार तेच ते उगाळत राहणे म्हणजे शिळी कढी नाही काय

मुळांत हा प्रमाद घडतो कारण आपल्याला त्यातीलनिगेटिव्हबाजू जास्त भावते. ‘बी पॉझिटिव्हहा उपदेश नेहमी इतरांना देण्यासाठी असतो. आपण गुणां ऐवजी दोषांवर जास्त लक्ष देतो आणि इतरांचे दोष उगाळत बसतो. मी म्हणतो हे योग्य नाही. अनेक संतसत्पुरूषांनी आपल्यातले दोष नि इतरांचे गुण पाहावे, त्यांचे अनुकरण करावे असे ठिकठिकाणी सांगितले आहेमात्र आपण याच्या अगदी उलट करत असतो.

मात्र तेही असू देत काय, आपण जरा शिळी कढीच पुन्हा तापवूंया. काय म्हणता, मोठ्ठी जांभई दिलीत ? तर मग थांबतो जरासा

रहाळकर

२३//२०२२



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?