Tuesday, February 22, 2022

 

साक्षात्कार आणि आत्म-साक्षात्कार

साक्षात्कार आणि आत्म-साक्षात्कार

आदरणीय श्री काकांनी मला आज्ञा केली की साक्षात्कारी पुरूष कसा ओळखावा ते सांगा. त्यांचा हा गुगली बॉल मी ओळखू शकलो. म्हणजेच तसे ओळखतां येणे हाच मुळात साक्षात्कार म्हटला पाहिजे. श्री समर्थांनीपढतमूर्खाची लक्षणें सविस्तर सांगितली, अर्थात आधी मूर्खलक्षणे सांगितल्यावर ! मी दोन्ही कॅटेगरींत चपखल बसतो हा मला झालेला साक्षात्कार ; नव्हे, आत्मसाक्षात्कार नव्हे कारण मला झाला असला तरी खरामीतो नाहीच मुळी ! अशा साक्षात्काराला इतर अनेकांप्रमाणे केवळ एक भ्रम म्हणता येईल

एखादी व्यक्ती चांगली किंवा वाईट आहे ते अनुभवांतींच कळेल, म्हणून त्याला साक्षात्कार म्हणता येणार नाही - ती एक  अनुभवजन्य जाणीव असेल एवढेच. मात्र जेव्हा तीच व्यक्ती  अपेक्षेच्या उलट वाईट किंवा चांगली वागली तर भ्रमनिरास होऊन त्याला साक्षात्कार म्हणू कदाचित ! (नाही पटले ना ? मलाही नाही ! ) असो

मला माहीत आहे की श्री काकांना असल्या फुटकळ साक्षात्काराची अपेक्षा नाही, आत्मसाक्षात्कारी पुरूष कसा ओळखावा ते सांगा अशी त्यांची आज्ञा आहे

वास्तविक अनेक उत्तम ग्रंथांत सिध्द पुरूषाची म्हणजेच आत्मसाक्षात्कारी पुरूषाची लक्षणे विस्ताराने सांगितली आहेत. तेच शब्द नि त्याच प्रमेयांवर मी (आज तरी) पोपटपंची करणार नाही, कारण ते निव्वळ पुस्तकी ज्ञान पाजळणे होईल. त्या ग्रंथांत अनेकानेक सिध्द पुरूषांची नावे आली असलीं तरी आजमितीस तसे सिध्दसाधक कसे ओळखावेत याचा विचार अगत्याचा आहे. तशी मंडळी शोधायला हिमालयात जायला नको किंवाआपण यांना पाहिलेत कायअशी जाहिरात करायला नको. कारण आत्म-साक्षात्कारी पुरूष कधी स्वत:चा बडेजाव तर मिरवणार नाहीच, उलट त्या सर्व प्रलोभनांपासून केवळ अलिप्त राहील


मी मागे अनेक साधुसंत नि सत्पुरूषांचा उल्लेख केला होता. मात्र ते सर्वचसाधकया कॅटेगरींतले, आत्मसाक्षात्कारा साठी धडपडणारे होते. त्यांतील काहींना अंततोगत्वा सिध्दावस्था प्राप्त झालीही असेल. मात्र ते समाजांत कधीहीसिध्दम्हणून वावरले नसते, कारण एकान्तवास हेच त्यांचे गंतव्य होते……..! 


सर्वसाधारणपणे ऋषितुल्य पुरूष पाहता येणे फारसे अवघड नाही. भगवी वस्त्रें किंवा कित्येक माळा गळ्यांत अडकवून वावरणारे ऋषितुल्य असतीलच असे नाही, खरेतर ते वास्तवांत तसे नसतातच. त्यामुळे बाह्य वेष-परिवेषांवर भाळून जाणे अत्यंत धोकादायक म्हटले पाहिजे

तथापि, ‘साधु-वृत्तीअशी एक चीज आहे, जी अशा वेषधारीबुवांपासूनकोसों दूर असते. ग्रंथांत नमूद केलेली उत्तम लक्षणे तर त्याच्यात असतातच, मात्र खरा आत्म-साक्षात्कारी पुरूष तीही झाकून ठेवतो. साहाजिकच तिऱ्हाइताला, अडाण्याला त्याचे साधुवृत्तीचा थांगपत्ता लागणे केवळ अशक्य

मला असं वाटतं की आत्म-साक्षात्कारी पुरूष, तो अजूनही देहधारी असल्याने, केवळ त्याच्यासहजवावरण्यातून ओळखतां येईल कदाचित् ! असे पहा, एखाद्या व्यक्तीचे निव्वळ सान्निध्य जेव्हा आपल्याला प्रमुदित करते, विलक्षण शांतीचा अनुभव देते, त्याचे शब्द केवळ अमृतमय असतात, तो जिकडे पाहेल तिकडे तो केवळ आनंदाचा वर्षाव असतो, अशा व्यक्तीला मी बेधडक आत्मसाक्षात्कारी म्हणून टाकीन. त्याचे कारण त्याने आपला दिव्यानंद, आत्मानंद, स्वानुभव-सुख स्वत:पुरते मर्यादित राहू देतां ते जणू आपसूक  आसमंतांत पसरत असते. तो स्वत: काहीच करत नसूनही ते दिव्य कार्य त्याचे मार्फत जगापुढे येते

तथापि इथे एक मोठा अडसर येतो सामान्यजनां साठी. ती दिव्य अनुभूती साठवून घेण्यासाठी त्यांचेपाशीं पर्याप्तॲन्टिनानसतो

मला अजून थोडे खोलांत उतरावेसे वाटतेंय. येताय् ना माझ्या बरोबर

आपल्या बहुतेक सर्व धार्मिक ग्रंथांतपाप-पुण्य’, पुनर्जन्म, स्वर्गप्राप्ती नि मोक्षप्राप्तीचा उल्लेख ठळकपणे येत राहतो. मात्र हे सर्व खूपॲब्स्ट्रॅक्टआहेत असे नाही वाटत आपल्याला, केवळ भ्रम आहे का तो. ‘शास्त्रानुरूपअसे म्हटले तरी त्यांची प्रत्यक्ष अनुभूती याच देहीं याच डोळां कोणी अनुभवली असेल ? संतचरित्रें त्यावर थोडा बहुत प्रकाश टाकूं शकतील मात्र ते वर्णन देखील स्थल-काल-सापेक्ष ठरेल, कदाचित पूर्ण सत्य नसेलही . आपण वाचीत आलोंय शास्त्रप्रचीती, गुरूप्रचीती, आत्मप्रचीती वगैरे. मला खरंच सांगा, तीआत्म-प्रचीतीआत्म-साक्षात्कार कुणी अनुभवलाय काय, आणि असलाच तर तो व्यक्त कसा करणार ? ज्ञानदेवांनीअनुभवामृतकथन केले, पण ते सांगण्यासाठी सुध्दा त्यांना शब्द-खंडन, अज्ञान-खंडन, इतकेच नव्हे तर ज्ञान-खंडनही करावे लागले. वेदांनुसारनेति नेतिअसेच बरेचसे निरूपण वाटले मला. (भूलचूक लेनी देनी ! - गांधीलमाश्यांच्या मोहोळावर मी दगड फेकलाय याची मला जाणीव होऊ लागली आहे. तरीही तुमच्यासारखे उदार सत्पुरूष या ब्यांशी वर्षांच्या बालकाला सांभाळून घेतील हीही खात्री आहे ! ) असो

श्रीमान देशपांडे काकांनी एक सुंदर आणि वास्तववादी स्फुट नुकतेच पाठवले आहे आपणां सर्वांना, साक्षात्कार याच विषयावर. माझे वरील लिखाण ते स्फुट वाचतांच लिहिलंय याची कृपया नोंद असूं द्यावी

रहाळकर

२२//२०२२ (किती मजेशीर तारीख आहे आज ! )


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?