Monday, January 31, 2022

 

गुरूत्वाकर्षण आणि मी !

 गुरूत्वाकर्षण आणि मी !

झाडावरून सफरचंद खाली पडताना पाहून न्यूटन ला प्रश्न पडला. अगदी तसाच कोकणात  नानामामा  गेला असताना जमीनीतले पाणी शुध्द, निर्जंतुक होऊन उंच उंच माडाच्या झाडाला लटकलेल्या नारळात कसे चढते, असा काहीसा वेडगळ भासणारा प्रश्न त्याचेही मनांत उद् भवला होता ! वास्तविक दोघांचेही प्रश्न वेडगळ नाहीत हे लवकरच जगापुढे आले.
खरेतर अतिशय शाहाणे असलेले आपण असल्या विचित्र प्रश्नांना काय म्हणून सामोरे जात नाही ? तसलेच प्रश्न आपल्यालाही का पडत नाहीत ? त्याचे कारण आपण आजवर आजूबाजूच्या घडामोडी ‘टेकन फ़ॉर ग्रॅन्टेड’ अशा पध्दतीने पाहात आलो आहोंत (न्याहाळत नाही असे मुद्दाम म्हटले नाही कारण त्यांत प्रश्न अनुस्यूत आहे ! -आहे की नाही भाषा लालित्य ! ) असो. 

मला या निमित्ताने माझ्यासाठी अत्यंत गहन असा सिध्दान्त जगापुढे म्हणजेच तुमच्या पुढे (माझे जग तुमच्यापुरतेच सीमित आहे ) मांडायचा आहे. 
असे पहा, पृथ्वीच्या केन्द्रस्थानी गुरूत्वाकर्षण नामक महाशक्ती स्थिरावली असून पृथ्वीच्या परीघातील सर्व पदार्थ ती आपल्याकडे खेचून घेते त्या त्या वस्तूच्या ‘घनते’ प्रमाणे. (परीघ, त्रिज्या, घनता, टॅन्जेन्ट वगैरे शब्दांनी निदान मला तरी सहावी सातवींत हुडहुडी भरवलेली असे, पण तुमचे तसे नाही असे गृहित धरून पुढची कथा सांगूं ! 

मुळांत याला ‘गुरुत्वा’कर्षण का म्हटले ? गुरू म्हणजे ज्येष्ठ, गुरू म्हणजे श्रेष्ठ वगैरे वगैरे. अगदी तसेच आकाशात, नव्हे, अवकाशात तशीच शक्ती विद्यमान असली पाहिजे जी सूर्य चंद्र नक्षत्रें तारे वगैरेंना त्यांचे त्यांचे आंतरिक गुरूत्वाकर्षणाने अवकाशात स्थिर ठेवते, जरी ते आपल्या नि इतरां भोंवती अव्याहतपणे फिरत असले तरी ! ही अवकाशातील शक्ती कुठे स्थिरावली असेल ? 

स्वामींनी एकदा ‘अल्लाह’ चा अर्थ ‘ऑल हाय’ असा सांगितला होता, पूर्णत: निर्गुण निराकार ! मग तो ‘अल्लाह’ नामक शक्तिस्त्रोत कुठे, कसा असेल ? 

तेही असू देत. मला माहीत आहे ‘वेदान्त’ जाणणारी किंवा जाणू पाहणारी मंडळी सरसावून पुढे येतील आणि ‘सर्वम् इदम् ब्रह्मम्’ वगैरे कठीण शब्दांचा आपल्यावर भडिमार करतील. (माझे तसे नाही. एकतर मी त्या भानगडींत फारसा पडत नाही. मला नि इतरांना सहज समजेल असे शब्द नि शब्दार्थ मला अधिक भावतात. तुमचेही तसेच ना ? ) 
तर मूळ प्रश्न बाजूलाच पडतोय् अजूनही. ते ‘कर्षण’ किंवा आकर्षण याच्या उलट काही दूर सारणारी शक्ती सुध्दा अस्तित्वात असेल काय ! फिजिक्स मध्ये नाही का एक वाक्य - लाईक फोर्सेस ॲट्रॅक्च इच अदर ॲण्ड अनलाइक रिप्पेल ‘ (किंवा ‘व्हाईस व्हर्सा) !  तर मग ही ‘रिप्पेल्लिंग’ पॉवर कोणती ? 
(कधी पडलेत तुम्हाला असले प्रश्न ? ) 
पहा जमलं तर नि वेळ असेल तर ! ! 
बाब्ब्बाय् ! ! ! 


Best wishes, 
Dr. Rahalkar
 
Visit my blog-site - http://prabhurahalkar.blogspot.com/


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?