Tuesday, December 07, 2021

 

तकिया कलाम !

 ‘तकिया कलाम’ !

हा शब्द वाचून गोंधळलात की काही आठवणी ताज्या झाल्या ?
आमची इंदौरकर मंडळी हा शब्दप्रयोग अनेक वेळा करत किंवा ऐकत आलीं आहेत, म्हणून आज फक्त पुणेकरांना वेठीस धरणार आहे. इतर मंडळींना हायसे वाटत असले तरी त्यांनाही ओढून घेणार आहेच म्हणा ! 
तर, तकिया कलाम म्हणजे नक्की काय, केव्हा वापरतात ही फ्रेज, कशासाठी वगैरेंचा उलगडा थोडक्यात करीन म्हणतो. 
जेव्हा एखादा शब्द किंवा वाक्य विनाकारण नि वारंवार उच्चारले जाते तेव्हा त्याचा होतो ‘तकिया कलाम’. मग तें तोंडाने उच्चारले किंवा कृतीतून दर्शवले गेले तरीही तो तकिया कलाम कहलाता है. 
काही उदाहरणे पाहूं. तुम्ही प्राण या सो-कॉल्ड व्हिलन ॲक्टरचे अनेक सिनेमे पाहिले असतील (मी सगळे पाहिलेत) . प्रत्येक चित्रपटांत त्याने वेगवेगळ्या संवई दाखवल्या आहेत - जसे निरनिराळ्या लकबींत सिग्रेट पेटवणे किंवा ओढणे, हाता पायांच्या विशिष्ट लकबी वगैरे वगैरे. त्या त्या चित्रपटा पुरता तो त्याचा तकिया कलाम ! कुणाकुणाला बोलता बोलता अनेक फुल्या असलेल्या शिव्या घुसडायची आदत तर कुणी शिवी घालूनच एखाद्याचे स्वागत करत असे ! तो त्याचा तकिया कलाम. (काहींना वारंवार रामकृष्णहरी म्हणायची सुध्दा संवय असते म्हणा ! ) 
जरा आठवून तर पहा, तुम्हाला प्रत्येकांत एखादा तकिया कलाम सांपडेलच सापडेल ! 
सिनेमातले किंवा नाटकातले काही प्रसंग  तकिया कलाम मुळे अधिक उठावदार होतात, चिरस्मरणीय होतात. “इतना सन्नाटा क्यों है भाई” किंवा “मूंछें हों तो ……जैसी,” किंवा “गोब्राह्मण प्रतिपालक” वगैरे शब्द रूढार्थाने तकिया कलाम याच सदरांत मोडतात. 
पहा, वाढले की नाही एक पक्वान्न खूप वेळ चघळण्यासाठी ? म्हणून आत्तां तरी आवरते घेतो कारण आता तुम्हीच अनेक तकिया कलाम मला रिटर्न गिफ्ट म्हणून देणार आहांत ! 

रहाळकर
७/१२/२०२१ (पुणे ! ! )

Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?