Monday, December 06, 2021

 

“मार्गशीर्ष” !

 ”मार्गशीर्ष”

भगवंताने आपल्या मोजक्या विभूती सांगताना ‘मासानां मार्गशीर्षोहम्’ असे का म्हटले असावे याचा शोथ घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. 
वर्षातील बारा महिन्यात मार्गशीर्षाचा नववा क्रमांक येतो. हिन्दींत या महिन्याला अग्रहायन असे म्हणतात (हायन म्हणजे वर्ष). कदाचित् खूप पूर्वीं नूतन संवत्सराचा प्रारंभ या महिन्यापासून होत असावा. त्याचे कारण याच महिन्यापासून उत्तरायण सुरू होते (साधारण २२ डिसेंबर

हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात.

मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला नववा महिना आहे. तो साधारण नोव्हेंबर,डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो.मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात. या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो.हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते. त्यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतीशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते. या वेळी धनधान्याची सुबत्ता असते.



बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं

मासानां मार्गशीर्षोsहं ऋतूनाम कुसुमाकर:



भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवतगीतेमधील विभूतीयोग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे.सामवेदातली गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुति म्हणजे बृहत्साम छंदामध्ये गायत्री छंद , सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतुंमध्ये वसंत ऋतु जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचं पूर्णवर्षातलं उच्च स्थान कसे आहे ते भगवत गीतेत वर्णिले आहे. याच महिन्यांत कित्येक सण साजरे केले जातात, जसे पहिल्या दिवशीं देव-दिवाळी, चंपाषष्ठी, श्रीदत्त जयंती, गीता जयंती, महालक्ष्मी व्रत वगैरे अनेक. आरोग्य दृष्ट्याही हा महिना अतिशय लाभप्रद ठरतो कारण पावसाळा संपून थंडी चांगलीच जाणवू लागते, एकूणच वातावरण चैतन्यमय असते, भूक देखील छान लागते आणि एकंदरच माहौल हवाहवासा वाटणारा असतो.
आज पुरवलेली माहिती तुम्हाला आधीच होती याची नम्र जाणीव असूनही पुन्हा तुम्हाला पाठवित आहे, गोड मानून घ्या - तसेही तिळगुळ घ्या गोड बोला असं वारंवार ऐकायचे आहे तुम्हाला !
रहाळकर६/१२/२०२१


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?