Friday, July 30, 2021

 

किसणी, विळी, रवी वगैरे !

 किसणी, विळी, रवी वगैरे


वर लिहिलेले आणि इतर कितीतरी शब्द कालौघांत हरवून जात आहेत आणि ते तिरकस उघड्या डोळ्यांनी नि तिखट कानांनी आमची पीढी अनुभवते आहे. आमच्या लहानपणीबंबांतगरम केलेले पाणी घंगाळांत घेऊन लोट्यालोट्याने आई आम्हाला आंघोळ घालत असे. दांत घासायलादतौनकिंवा माकडछाप दंतमंजन असे. (गिब्जची सुगंधी गोड वडी, मॅकलीन्स  नि लहानसा टूथब्रश नंतर आले. हल्लीफ्रेश होऊन येतोऐवजी परसाकडे किंवा शेतखाना म्हणायला लाज वाटत नसे ! डोईला चपचपीत चमेलीचे तेल चोपडणे नि फुगा काढून केससेट्करण्यांत खूप वेळ जाई. आईची बिलोरी आरसा असलेली कुंकवाची लाकडी पेटी कधीच हरवूनव्हॅनिटी बॅग्जनी जागा घेतली. फणी, गुंतवळ, रिबिनी, आफगाण स्नो केव्हा गायब झाले ते कळलेच नाही. हल्लीच्या बरम्युडा ऐवजी सरळ खाकी चड्ड्या (निकर्स) असत म्याट्रिकपर्यंत नि पुढे घरी घालायचे पट्टेरी पायजमे (निर्वासित सिंध्यांनी आयात केलेले) . 

सायकल हे एकमेव हक्काचे स्वस्त नि मस्त वाहन आणि त्याची देखभाल इतकेच नव्हे तर घरच्याघरी पंचर काढणे ही कला अवगत करून घ्यावी लागे

अगदी लहानपणी मातीच्या चुली निवेलअसत आणि वारंवार होणारा धूर काढून अग्नी प्रज्वलित ठेवण्यासाठी दणकट लोखंडीफुंकणीकितीजणांना आठवतेय्

अजून प्रत्येक घरात विळी आणि तिला जोडलेलीखवणीअसेलच मात्र नवीन पीढीला कटिंग बोर्ड नि सुऱ्या जास्त सुटसुटीत वाटतात नाही ! ताक घुसळायला किंवा डाळ सारखी करायला रवी सारखे उपयुक्त हत्त्यार नाही म्हणा. आधीची घमेली, हंडे, पोळी ठेवायचे पेढेघाटी डबे आतां ॲंटिक पीस म्हणून घासून पुसून ठेवतात दिवाणखान्यांत, नव्हे हॉल किंवा सिटिंगरूम मधे

यांतले बरेचसे शब्द आत्ताचे पीढीला माहीतही नसतील, मात्र तुमचा नोस्टाल्जिया ताजातवाना झाला की नाही


रहाळकर काका 

२८ जुलाय २०२१ 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?