Tuesday, July 27, 2021

 

बर्फाचा गोळा नि हिमालय !

 बर्फाचा गोळा नि हिमालय


परवांच पं. उपेन्द्र भट यांची मुलाखत पाहात होतो. ‘इंद्रायणी कांठीहे गदिमांचे गीत त्यांनी पुलं समोर गाऊन दाखवले आणि पु. . त्यांना शाबासकी देत असतांना भट त्यांना म्हणाले की किती गोड चाल दिली आहे तुम्ही या गाण्याला, तेव्हा हजरजबाबी पु म्हणाले, ‘अरे मी भीमसेनच्या हातावर बर्फाचा गोळा ठेवला, पण त्याने त्याचा हिमालय केला ! ‘ 


हा प्रसंग पाहतांना मनांत आले की खरोखर लहानशी संधी मिळताच तिचे सोनें करता आले पाहिजे. कित्येक थोर नि यशस्वी व्यक्तींची चरित्रें किंवा अनुभव पाहतां प्रत्येकाने हाच मार्ग चोखाळल्याचे लक्षात येईल. अर्थात त्या क्षणाची योग्यायोग्यता केवळ नशीब बलबत्तर असेल तरच जाणवेल


महत्वाचे आहे ते मिळत असलेली संधी वेळ दवडतां झेलतां आली पाहिजे. अशा वेळी कुणीधरसोड वृत्तीवगैरे विशेषणे लावलीं तरी गेलेली संधी पुन्हा येईलच हे सांगता येत नाही. माझा स्वत:चा अनुभव असा की प्रसंगानुरूप मी संधी घेत गेलो, प्रसंगीं तात्पुरते अपयश किंवा अवहेलना ऐकूनही ! (मन की खुशी दिल का राज - अशी माझी वाटचाल राहिली आहे ) अर्थात ती दरवेळीं यश पदरीं पाडून गेली नसली तरी आज मी संतुष्ट आहे मी तेव्हा घेतलेल्या काही वेड्यावांकुड्या निर्णय नि उड्यांबद्दल


ते असो, मला असे सुचवायचे आहे की संधीची सुवर्णसंधी करणे बहुतांश वेळी किंवा खरेतर नेहमी आपल्याच हातीं असते. ‘वाल्याचावाल्मिकीहोऊ शकतो, अगदी तसेच सद-गुरूंनी दिलेल्या एका नामाने हिमालय चढून जाणे अशक्य नाही. मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे कित्येक संत सत्पुरूष आणि थोर यशस्वी व्यक्तींचें, ज्यांनी पाहाता पाहतांबर्फाच्या गोळ्याचे’ ‘हिमालयांतरूपांतर करून टाकले. विशेष म्हणजे बहुतांश गृहस्थाश्रमांत असूनही मनौनि नि वृत्तीने संन्यस्त होऊन राहिले. मला माहीत आहेत अशा कित्येक व्यक्ती, ज्याश्री श्री किंवामहाराजइत्यादी बिरूदें मिरवतांही हिमालयाच्या उंचीचे किंवा योग्यतेचे होऊन गेलेत किंवा आहेत. (जरूरत है सिर्फ उन्हे पहचानने की और दिल दिमाग मे संजोये रखनेकी ! ) 


अधिक विषयांतर होण्यापूर्वी थांबतो, मात्र याबर्फ के गोलेपर जरूर तबज्जोह कीजियेगा


प्रभू रहाळकर 

२७ जुलाय २०२१ 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?