Saturday, January 30, 2021

 

नि:संगाचा सांगाती

 नि:संगाचा सांगातु..........! 


म्हणौनि तो भगवंतु जो नि:संगाचा सांगातु तो म्हणें पार्था दत्तचित्तु होई आतां .....


ही ओंवी वाचता वाचतांनि:संगाचा सांगातुया शब्दावर चांगलाच  रेंगाळलों ! अचानक अनिलांच्यासांगातीया काव्यसंग्रहातल्या   कवितेचे शब्द झर्रकन तरळून गेले. ! 


हातीं हात धरून माझा 

चालवणारा कोण तूं

जेथे जातो तेथे माझा 

काय म्हणून सांगाती

          आवडतोस तूं मला 

          की नावडतोस

          येवढे मात्र जाणवते कीं 

माझा हात धरून असे चालवलेलें

मला मुळीच खपत नाही


स्वच्छंदाला माझ्या त्याचा करकोचा पडतो ना ! ! 


झिडकारून तुझा हात

म्हणून दूर पळून जातो 


        बागडतों, अडखळतों, धडपडतों 

      केवळ तूं कनवाळू पाठीशीं उभा म्हणून

      माझे दु: जाणवून

      उगाच किंचाळत सुटतों


एऱ्हवीं तूं नसतांना

पडलों अन् लागलें तर

पुन्हा उठून हुंदडतों     ! ! 


खांद्यावर हात माझ्या सदोदित

असा ठेवूं नकोस ना

अशानेच माझी वाढ खुंटत जाते

असे मला वाटते ना ! ! 

          बरोबरीचे वागणें हें खरोखरीचे आहे का

          खूप खूप माझी उंची एकाकी

          माझी मलाच वाढवूं दे -


तुझ्याहून नसली तरी तुझ्यासमान होऊं दे 


तोंवर असे दूरदुरून,

तुझा हात दूर करून

मान उंच उभारून

तुझ्याकडे धिटकारून पाहूं दे ! ! ! ‘



कवी अनिलांचा हा सांगाती आणि माऊलींचा सांगाती एकच आहेत असे नि:संदिग्धपणे मानले तरी माऊली सर्वसंग परित्याग करून त्यासांगातीला आळवतात तर कवी आपल्यास्वत्वाला बाधा येऊ देतां, स्वच्छंदावर गदा येऊ देतां, त्याला दुरून अनुभवतोय - तो संगट आहे या विश्वासाने


बुचकळ्यात टाकणारे हे विधान वरवर पाहिले तर निराळे भासले तरी मुळात अनुभव एकच आहे ना ? श्रेयस की प्रेयस ? ? 


कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती - ! 


रहाळकर

३० जानेवारी २०२१




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?