Sunday, December 13, 2020

 

फुगा आणि बुडबुडा !

 फुगा आणि बुडबुडा ! 


खरं तर दोन्हीही केवळ हवेने भरलेले, पण त्या दोन्हीतला फरक आज अचानक लक्षात आला. पहा तुम्हाला भावतोय का तो - 

असे पहा, रबराचा फुगा त्याचे कॅपॅसिटी एवढाच फुगवतां येतो, जास्त फुगवला तर किंवा कुणी ‘पिन’ मारली तर लगेच फुटतो आणि त्याचे अवशेष केविलवाणे दिसतात ! 

आपल्या गर्वाचे किंवा अहंकाराचे तसेच आहे. रंगरूप, कुलशील, संपत्ती, विद्वत्ता, बळ, सात्विक किंवा ‘सोज्वळपण’ या सर्वांचा ‘फुगा’ फुटला की माणूस कसा केविलवाणा होतो नाही ! 


बुडबुड्याचे तसे नाही. तो पाण्यातून कधी निर्माण झाला नि कधी पाण्यातच विलीन झाला ते कळतही नाही. बुडबुड्याची उपमा मला जीव-चैतन्याच्या मन बुध्दी चित्त नि अहंकार या अविष्कारांपैकी ‘अहंकाराला’ द्यावीशी वाटते. हा अहंकार त्रासदायक किंवा त्याज्य नाही, कारण ते ‘असणेपणा’चे, ‘आहेपणा’चे लक्षण आहे. हा अहंकार जीव-चैतन्याबरोबर आला आणि ते असेपर्यंत टिकणारा आहे. याला कितीही टोचले तरी तो फुटणार नाही नि म्हणून ‘केविलपणा’ नाही, केवळ ‘कैवल्यच’ ! 


जरा जास्तच झालाय् का हा ‘डोज’ ! क्षमस्व ! ! 


प्रभु रहाळकर

११/१२/२०२० 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?