Wednesday, July 29, 2020

 

वर्तमानपत्रें - कालची नि आजची !

वर्तमानपत्रें - कालची नि आजची


गेले चार महिने वर्तमानपत्रा शिवाय (‘पेपर शिवाय’) गेले. खरंतर त्याचे अजिबात वैषम्य नाही कारण गेली कांही वरूषें केवळ रोजच्या संवईमुळे पेपर हातीं घेतला जाई. चहाच्या विशिष्ट ब्रॅंड प्रमाणे पेपर्स ही बदलून पाहिले दर महिन्याला, पण आतांतेसमाधान मिळत नाही हेच खरे ! बरे झाले, सकाळचा वेळ फुकट दवडणे तरी कमी झाले ! असो

तसं म्हटलं तर एकदा वाचून झाल्यावर लगेचच झालेलावेस्टपेपरअनेक दृष्टींनी उपयुक्त देखील ठरत असे, विशेषकरून मध्यम वर्गीयांसाठी, ज्यांच्या महिन्याचा शेवटचा आठवडा सहसारद्दी वीकअसे ! असो

काल नि आजच्या वृत्तपत्रांत कमालीचा फरक पडलाय् हे मात्र नक्की. तेव्हा नुसती नांवेच नव्हे तर ते पेपर्स खरेखुरे भारदस्त होते. आठवणींची कपाटें उघडतांच कोंबून ठेवलेले असंख्य बोळे गडगडत खाली पडले. त्यांतील काही उचलून, सरळ करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे

इंदौरला होळकर कॉलेजची रीडींग रूम आणि राजवाड्या समोरच्या जनरल लायब्ररीच्या तिन्ही गॅलरीत जवळ जवळ वीस पंचवीस  ‘पेपर्सदररोज बदलले जायचे. दोन्ही लायब्ररीज मिळून मी बहुधा सर्व पेपर्स नजरेखालून घाली (इतका वेळ अभ्यासांत घालवला असता तर कदाचित नेहमीच पहिल्या वर्गांत उत्तीर्ण होऊ शकलो असतो) ! तथापि, त्या पेपर्सनी माझे ज्ञान अद्यावत ठेवले हेही तितकेच खरे . असो


काय भारदस्त होते त्यांतले अनेक ! ‘पांचजन्य’, ऑब्झर्वर, दि स्टेट्समन, अमृतबाजार पत्रिका, नवभारत टाईम्स, नईदुनिया, जागरण, दैनिक भास्कर, केसरी, मराठा, पुढारी, गांवकरी, (जुना) सकाळ, तरूणभारत ; शिवाय इंडियन एक्स्प्रेस, टाईम्स, ब्लिट्झ, इलस्ट्रेटेड वीकली, फिल्मफेअर, स्क्रीन, प्रावदा, दि गार्डियन, सत्यकथा, धर्मयुग सनातन सारथी वगैरे वगैरे वगैरे

खरंतर त्या त्या पेपर्स किंवा नियतकालिकांतली काहीसदरेंमला ओढून ओढून नेत असत. काहींचे अग्रलेख मला प्रिय असत तर काहींचीस्फुटें’ - जी कधीकधी स्फोटक असत. टाईम्स केवळ आर के लक्ष्मणच्या कार्टून्स नियू सेड इटमुळे, शिवायस्पीकींग ट्रीमुळे देखील ! इंडियन एक्स्प्रेस नि (जुना) सकाळ त्यांचे नॉन-पार्टिसन वृत्तीमुळे. ब्लिट्झ नि मराठा जहाल लिखाणांमुळे तर पांचजन्य नि ऑब्झर्वर त्यांतील प्राचीन भारतीय संस्कृतीला ठळकपणे मांडण्यासाठी. ‘प्रावदानि दि गार्डियन खरंतर कळत नसत, पण थोडेबहुतशो-ऑफसाठी हेही खरे

दुर्दैवाने आजच्या पेपर्स मधे ती ओढून घेण्याची कुवत मला तरी दिसत नाही. बरे झालेपेपर बंद कायमचाकेला ते


प्रभू रहाळकर

२९//२०२० 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?