Tuesday, June 04, 2024

 

जाणीव नेणीव…..!

 जाणीव नेणीव भगवंतीं नाही……! 

हरिपाठांत श्री ज्ञानदेव म्हणतात, ‘जाणीव नेणीव भगवंतीं नाही’. भगवंताला आपण सगुण साकार तसेच निर्गुण निराकार देखील मानत आले आहोत. तो सर्वव्यापी, सदासर्वदा असतच असणारा सर्वशक्तिमान असे म्हणतो - Omniscient, Omnipresent and Omnipotant. तो एकमेवाद्वितीय असे म्हणतो, त्याचेवांचून अन्य काही नाही. तो स्थूल नि सूक्ष्म दोन्ही आहे, दृष्य आणि अदृष्य देखील तोच. त्यालाजाणीवनिनेणीवदोन्ही नाहीत, अहंकाराचा लवलेश नाही, सुख नि दु: तर त्याचे खिजगणतींत नाहीत. तो द्वैती नाही की अद्वैतही


तरीही तोएकटाअसल्याची भावना कुठून आली, ‘एकोsहम् बहूस्यामअसे कसे वाटले ? असे काही प्रश्न पडले की साधू, संत, सत्पुरूषांची प्रकर्षांने याद येते. कुणीतरी अधिकारी व्यक्तीने सोप्या शब्दांत हे गूढ उकलून दाखवावे असे मनोमन वाटत राहते. मला माहीत आहे कीआर्टिफिशियल इन्टिलिजन्सच्या या जमान्यात कदाचित या प्रश्नांची उत्तरें मिळतीलही. पण एखाद्या सुहृदाने, विद्वान किंवा विदूषीने असे प्रश्न सोपे करून सांगितले तर ते नक्कीच प्रत्येकाला आवडतील, भावतील ! म्हणूनच हे लघु निवेदन. कोणी सांगेल काय याची उकल

रहाळकर

जून २०२४.  



Comments:
सर, मला वाटते भगवदगीता अध्याय ५ श्लोक १४ मध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर भगवंतांनी दिले आहे.
न कर्तुत्वं न कर्माणि... स्वभावस्तु प्रवर्तते ।।
सूर्याच्या प्रकाश आणि उष्णतेवर हे जग चालू आहे पण सूर्यास त्याची काही कल्पना आहे काय? तसेच या बाबतीत पण!
विलास जोशी


 
माझ्या आधीच्या कॉमेंटला अनुसरूनच खालील संदर्भ मांडुक्य उपनिषद् मध्ये पण मिळतो.

भोगार्थं सृष्टिरित्यन्ये क्रीडार्थमिति चापरे।
देवस्यैष स्वाभावोऽयमाप्तकामस्य का स्पृहा ॥1.9॥

कुछ लोग "सृष्टि भोगके लिये है" ऐसा मानते हैं और कुछ "क्रीडाके लिए है" ऐसा समजते हैं. परंतु वास्तवमें तो यह भगवान् का स्वभाव ही है क्योंकी पूर्णकामको इच्छाही क्या हो सकती है?

Others think that the manifestation is for the purpose of enjoyment (of God) while still others attribute it to mere diversion (on the part of God), Rut it is the very nature of the Effulgent Being (Ātman) (for), what other desire is possible for Him whose desire is always in the state of fulfilment?

येथेच आपल्या प्रश्नाचे उत्तर.
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?