Monday, December 01, 2025

 

खडे आणि गुंतवळ !

 खडे आणि गुंतवळ

आमच्या आणि कदाचित नंतरच्या एका पीढीपर्यंत वरील दोन्ही शब्द बहुधा दररोज ऐकावे-बोलावे लागले असतील भोजनं किंवा अन्य काहीही, विशेषत: घरात खाताना ! कितीही व्यवस्थितपणे धान्य निवडले असले तरी एखादा तरी खडा दातांखाली हमखास येत असे. कोणी त्याला बोलता अलगत काढून टाकायचा तर बहुतेक वेळीआईग्ग्गअसे किंचाळत आगपाखड करायचा. बहिणींचे गुंतवळ तर हमेशा इतस्थता फिरतच पण जेवणाचे ताट कदाचित अधिक प्रिय असायचे तेव्हा ! माझे हे अनुभव युनिव्हर्सल नसतील कदाचित् पण घरोघरी तेव्हा मातीच्या चुलीच तर असत ना !  


अब जमाना बदल गया है. छानपैकी निवडलेली धान्ये आता सर्रास मिळू लागलीत, बाया-बहिणींचे गहू तांदूळ डाळी निवडण्याचे श्रम कमी झाले - सबकुछ रेडीमेड वेल-प्याक्ड ! हॉटेल- रेस्ट्रॉंप्रमाणे शेफ मंडळी आतां डोईवर टोपी वा स्रार्फ मिरवतात त्यामुळे गुंतवळ निदान पानांत पडत नाहीत. ते असो


भिजवलेले वाल सोलताना अधूनमघून गणंग वाल बाजूला सारावे लागतात. एक चांगली सुगृहिणी ते मातींत पेरते आणि नवी पालवी मिळते. माझी बहुतांश लिखाणे अशी गणंग असली तरी अधूनमधून छान कोंभ फुटलेली देखील असतात ना, तशी काही लिखाणे पुन्हा उकरून काढली तर माझ्यासारखीच तुम्हालाही मजा येईल कदाचित


आता थांबतो कारण गणंग म्हणता चक्क खडा म्हटले तर त्याला वेळीच बाजूला सारले पाहिजे आणि हो, गुंतवळांचा गुंता होण्याचे टाळावे बरे का

रहाळकर

डिसेंबर २०२५.        


This page is powered by Blogger. Isn't yours?