Monday, July 31, 2023

 

फटफटीवाले तपस्वी !

 फटफटीवाले तपस्वी


काल अचानक मिलिंद म्हणाला की काका तुम्ही अजून मोटर-बाईक्स् बद्दल कधी लिहिले नाहीत. आणि मला आठवला माझा मेडिकल मधला वर्गमित्र श्रीनिवास तपस्वी. तो मूळचा नि नंतरचाही अस्सल पुणेकर होता. एकदा मला पुण्याला भेट द्यायची होती उन्हाळ्याच्या सुटींत म्हणून मी त्याला त्याचा पुण्याचा पत्ता विचारला. त्यावर तो अस्सल पुणेकर उत्तरला (स्वत:चा पत्ता सांगतां ! ) की अरे पुण्यांत कुणालाही फटफटीवाले तपस्वी कुठे राहतात ते विचार आणि एखादे शेंबडे पोर ही तुला आमच्या घरीं आणून सोडील ! (किती सार्थक नि जाज्वल्य वगैरे अभिमान पुण्यातल्या शेंबड्या पोरावर देखील ! ! ) असो

खरंतर पुणे त्या काळी सायकलींचे शहर म्हणूनच प्रसिद्ध होते. काही मोजक्या मोटारगाड्या नि त्यांहून कितीतरी कमी अशा स्वयंचालित दुचाक्या तेव्हा नजरेस पडत

आमचे इन्दौर सुद्धा सायकलींचेच शहर होते आणि शहरात एकूण पाचपंचवीस मोटर-सायकली (फटफट्या) नि स्कूटर्स असत, (मोटारीच अधिक) . त्या काळीं रॉयल एन्फील्ड, जावा, राजदूत, तसेच लॅम्ब्रेटा, व्हेस्पा नि विजय आणि फारतर ल्यूना सारखी जुजबी वाहने रस्त्यावर फिरताना दिसत

माझी पहिली मोटारसायकल होती रॉयल एन्फील्ड ने बनवलेली लहानशी सुटसुटीत . cc ‘शेर्पा’. ती गाडी मी काही वर्षे पुण्यात सुद्धा बरीच ताबडली. कधीकधी ओव्हर फ्लडिंग मुळे खूप किक्स माराव्या लागत हे खरे असले तरी माझे माझ्या दुचाकीवर (देखील ) अतोनात प्रेम होते. तीच शेर्पा घेऊन मी सत्तर एक्काहत्तर सालीं इचलकरंजी, सज्जनगड, अलिबाग नागांव आणि मुंबईच्याही बऱ्याच सफरी यशस्वीरित्या केल्या होत्या. माझी शेर्पा नि मामाची राजदूत मी खूप वर्षें वापरली. मी नि मामाने तर खूप लांबलांबची आव्हानें लीलया पेलली होती. मसलन् पुणे-इंदोर, पुणे-अंबेजोगाई, पुणे-पांवस रत्नागिरी वगैरे कित्येक

त्यावेळेस मागच्या सीटवर बसलेल्याच्या दोन प्राथमिक जबाबदाऱ्या असत - एकतर बरोबर घेतलेली उकडलेली अंडीं सोलून चालवणाऱ्याला देणे नि दुसरे, हातांत कायम एक दंडुका किंवा बॅटन तयारींत बाळगणे (हेतु असा की रात्री बेरात्री कोणी गाडी अडवायचा प्रयत्न केलाच तर फटका मारून पुढे पळ काढणे ! अर्थात ती वेळ कधी आली नसली तरी ते अशक्यही नव्हते कारण अंबेजोगाई रस्त्यावर त्या जमान्यात पूल असे नव्हतेच, असंख्यकल्व्हर्ट्सवरून प्रवास घडत असे

श्रीश पुटपर्थीला शिकत असतांना रेल्वे रिझर्वेशन मिळाल्याने आम्ही चक्क माझ्या बजाज सूपरने ते एक हजार किमी. अंतर सव्वीस तासांत पूर्ण कापले होते ! असो

पुण्यांत त्या काळात सुद्धा प्रचंड खड्डे असत, रस्त्यात कधीमधी तेल सांडलेले असे, ‘गायलॅंड्सतर जागोजागीं ! मात्र तशाही स्थितींत मी घरी नसलो तर माझ्या दुचाकीवर हमखास भेटणे शक्य असे. बावधन ते आळंदी मी असंख्यवेळा माझ्या बजाज सूपरने वाऱ्या केल्या आहेत. असे म्हणतात की आम्ही सहकुटुंब खेडोपाडीं सेवेसाठी दर शनिवार रविवार किमान पंधरा वर्षें जात आलेले आहोत, अर्थात दुचाकी या एकमेव वाहनाने

माझ्या मुलाला तसेच मुलीलाही दुचाकी वाहन चालवायला भारी आवडते. त्याने देखील त्याच्याहिरो होंडाने इंदोर नीमच, इंदोर भोपाळ वगैरे प्रवास रातोरात केलेला आहे

मला जेव्हा समजले की लंडन निवासी मिलिंदने भारतातून खास रॉयल एन्फील्डचीबुलेटलेटेस्ट व्हर्जन इंग्लंडमधे इम्पोर्ट केली आहे तेव्हा ऊर अभिमानाने भरून आला

एक गुपित सांगू? श्रीशच्या इथल्या पंधरावीस मित्रांनी जणू अहमअहमिकेने एकमेकांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा जणू चंग बांधला आहे. वीस बावीस वर्षांत एकाने सायकल विकत घेतली की इतरही घेऊ लागले, एकाने कार घेतली की एकेक करून कार खरेदी करू लागले, एकाच्या दोन दोन कधी झाल्या ते तर कळले नाहीच पण मुलामुलींच्याही मोटारींची त्यांत भर पडत गेली. एकाने स्वत:चे घर विकत घेताच प्रत्येकाने तो कित्ता गिरवला आणि आता तर मोठे, अधिक मोठे घर बांधायची टूम निघाली आहे. (हे सर्व तृप्त नजरेने पाहात असताना एक विचार सहज तरळून जातो - कोणीतरी लवकरच आपले स्वत:चे हेलिकॉप्टर विकत घ्यावे, गेला बाजार निदान एकेक जेट् विमान तरी ! ) 

मिलिंदने हा सगळा पाचकळपणा करायला भाग पाडलेंय् मला, देयरफोर  आय प्लीड -‘ नॉट गिल्टी’ ! ! ! 

रहाळकर

३१ जुलाय २०२३



Thursday, July 27, 2023

 

तसबीर बनाता हूं…..!

 तसवीर बनाता हूं……!


एकोणीसशे पन्नास सालच्या बारदान या चित्रपटातलं हे गाणे तलत महमूद यांनी आपल्या मृदु थरथरत्या आवाजात गायले आणि रेडिओवर ते प्रचंड लोकप्रिय झाले. माझ्या वडिलांना तर ते खूपच आवडायचे. आताच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे ते जसेच्या तसे पुन्हा पुन्हा ऐकता येते

मी सुद्धा ते नुकतेच वरचेवर ऐकले आणि ऐकता ऐकतां एक वेगळाच संदर्भ लावावा असे वाटले. वास्तविक हे विरहगीत आहे आणि प्रेमी आपल्या प्रेयसीला उद्देशून ते गातोय हे कुणालाही सहज कळेल. तथापि, माझ्यासारख्या तिरपी नजर असलेल्याला त्यांत वेगळेच काही असेल असे वाटणे अजिबात नवलाचे नाही

आधी तें गाणे ऐकूं नि मग शब्दही पारखून घेऊया. गाणे वाचून झाल्यावर त्यातले वेगळेपण सांगायचा प्रयत्न करीन. सर्वप्रथम या गाण्याचालुफ्तलुटूंया


तसवीर बनाता हूं, तसवीर नही बनती तसबीर नही बनती….

एक ख्वाब सा देखा है, तारीर नही बनती, तसवीर नही बनती ।धृ।

बेदर्द मुहब्बत का, इतना सा है अफसाना

नजरों से मिली नजरें, दिल हो गया दीवाना

अब दिलके बहलने की, तसवीर नही बनती, तसबीर नही बनती, तसवीर बनाता हूं तसवीर नही बनती…..

दमभर के लिये मेरी, दुनिया मे चले आओ 

तरसी हुई आंखों को, फिर शक्ल दिखा जाओ

मुझसे तो मेरी बिगडी हुई, तसवीर नही बनती तसवीर नही बनती

तसबीर बनाता हूं तसवीर नही बनती, तसवीर नही बनती….! ! 


गाणे सुंदर आहेच आणि ते अतिशय गोड आवाजात तलत महमूदने गायले यांत शंकाच नाही. मात्र मज शंकासुराच्या मनांत अचानक देव अवतरला आणि म्हणाला की अरे त्या अनामिक प्रेयसी ऐवजी तिथे मला ठेवून पाहा की एकदां ! ! म्हणून मी माझ्या आराध्य स्वामींना नजरेपुढे ठेवले आणि चक्क ते गाणे गाऊन पाहिले

पहा तुम्हालाही जमेल तसे कदाचित ……..!

रहाळकर

२७ जुलाय २०२३





This page is powered by Blogger. Isn't yours?